Ad will apear here
Next
‘सुसंगती आणि विसंगतीचा शोध कथा घेते’
पुणे : ‘जिग्सॉ पझल सोडवणे, कथा लिहिणे म्हणजे माणसाच्या आयुष्यातील अनेक शक्यतांचा प्रवास साकार करणे असते. वर्षानुवर्ष आपल्या मनात घर करून बसलेल्या माणसांना घर मिळवून देणे असते. माणसाच्या वागण्यातील सुसंगती आणि विसंगती यांचा शोध घेणे असते,’ असे मत प्रसिद्ध लेखिका मृणालिनी चितळे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे (मसाप) आयोजित ‘कथासुंगंध’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यांच्या ‘नातं’ व ‘शिंदबाजचा म्हातारा’ या कथांचे अभिवाचन शुभांगी दामले व सौदामिनी साने यांनी केले. या वेळी ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.

चितळे म्हणाल्या, ‘माणसामाणसांतील नातेसंबंधाविषयी माझ्या मनात अपार कुतूहल आहे. हे कुतूहल हेच माझ्या कथा लेखनामागची प्रेरणा आहे. तसे पाहिले, तर आपल्या रोजच्या आयुष्यात खूप काही वेगळे घडत असते, बिघडत असते. कुणाच्या तरी बोलण्यातील एखादे वाक्य, एखादा प्रसंग, वाचनात आलेले एखादे विधान मनात रेंगाळत राहते. आत आत रुतत जाते. कुठल्या-कुठल्या संदर्भाचे धागे त्याला जोडले जातात. कधी त्यामध्ये कल्पनेचे रंग मिसळले जातात. अंतर्मनात काहीतरी वेगळे घडत असल्याचे जाणवते. त्यातील उत्कट भाव अधिकाधिक गडद होत जातात, तेव्हा हातात लेखणी धरणे अपरिहार्य ठरते. एकापुढे एक रचत गेलेले प्रसंग, त्यांना सांधत जाणारे नेणिवेच्या पातळीवरील दुवे कागदावर उतरवताना एखादे जिग्सॉ पझल जुळवत असल्याची अनुभूती येते. जिग्सॉ पझलला एक चौकट असते; पण हे अनुभूतीचे जिग्सॉ पझल, मात्र वेस नसलेल्या गावासारखे कोणत्याही दिशेला पसरत जाते.’

‘आपण सर्वजण काऊ-चिऊच्या गोष्टी ऐकत मोठे झालो. त्यामुळे सगळ्यांना आवडणारा, आकर्षित करणारा असा हा साहित्यप्रकार आहे. दिसायला अतिशय सोपा, पण लिहिणाऱ्याच्या दृष्टीने तेवढाच अवघड. कारण कथा यशस्वी होण्यासाठी फक्त ‘काय घडले’ हे सांगणे पुरेसे नसते, तर ते ‘का’ घडले याचा शोध घेणे अपेक्षित असते. त्यासाठी आजूबाजूच्या घटनांमागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची क्षमता असावी लागते आणि मानसिक आंदोलने जाणून घेण्याची संवेदनशीलता ही असावी लागते म्हणूनच कथालेखन हे आव्हानात्मक ठरते,’ असे चितळे यांनी नमूद केले.

सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZNSBM
Similar Posts
‘लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखन कार्यशाळा उपयुक्त’ पुणे : ‘लेखन आणि साहित्यनिर्मिती ही एक सृजनात्मक प्रक्रिया आहे. लेखक जोपर्यंत अंतर्बाह्य ढवळून निघत नाही, विविध प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात नाही, वेगवेगळ्या जाणिवांची, अनुभवांची बेरीज करीत नाही तोपर्यंत सकस साहित्यकृती निर्माण होणार नाहीत. लेखकाचे भरकटलेपण दूर करण्यासाठी लेखनविषयक कार्यशाळा उपयुक्त
‘युवा पिढीने नियमित व्यक्त होणे गरजेचे’ पुणे : ‘मराठी साहित्याला तंत्रज्ञानाच्या सहाय्याने समृद्ध, सजस व अजरामर करण्यासाठी व लोकशाहीला बळकट करण्यासाठी युवा पिढीने नियमितपणे विविध सामाजिक-राजकीय विषयांवर परखडपणे व्यक्त होणे गरजेचे आहे,’ असे मत जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी मांडले.
पुणे येथे ब्लॉगलेखन कार्यशाळा पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ब्लॉगर बना’ ही लेखन कार्यशाळा आयोजित केली आहे. यात ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉगलेखन कसे करावे, त्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान, ब्लॉग निर्मिती प्रक्रिया आणि कमर्शियल ब्लॉगिंग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.   ब्लॉगलेखन
‘जागतिक महिला दिन हा आत्मचिंतनाचा दिवस’ पुणे : ‘जागतिक महिला दिन हा महिलांनी स्वतःविषयी आणि स्वतःच्या परिस्थितीविषयी गांभीर्याने विचार करण्याचा दिवस आहे. आज महिला दिनाच्या सोशल मीडियावर पावसासारख्या शुभेच्छा पडत आहे. शुभेच्छा देऊन जबाबदारीतून मुक्त झाल्यासारखे त्यांना वाटते ही अतिशय चिंतनीय बाब आहे. जागतिक महिला दिन हा साजरा करण्याचा दिवस नाही, तर तो आत्मचिंतनाचा दिवस आहे,’ असे मत डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language